Hinjawadi News: हॉटेलमध्ये बालकामगार ठेवल्याप्रकरणी मालकाला अटक

आरोपी दगडे याचे बावधन बुद्रुक येथे साई वडापाव व स्नॅक्स सेंटर नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आरोपीने 12 वर्षाच्या मुलाला वडापाव देण्याचे, टेबल पुसण्याचे काम दिले होते.

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये कामासाठी बालकामगाराला ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एका हॉटेल मालकाला अटक केली आहे.

भानुदास सुखदेव दगडे (वय 40, रा. बावधन बु. ता. मुळशी) असे अटक केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी कामगार अधिकारी एस एच चौबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दगडे याचे बावधन बुद्रुक येथे साई वडापाव व स्नॅक्स सेंटर नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आरोपीने 12 वर्षाच्या मुलाला वडापाव देण्याचे, टेबल पुसण्याचे काम दिले होते.

ही बाब सरकारी कामगार अधिकारी चौबे यांच्या शुक्रवारी (दि. 4) दुपारी साडेतीन वाजता निदर्शनास आली. त्यांनी याबाबत शनिवारी (दि. 5) फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.