Hinjawadi : शिवनेरी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसने (Hinjawadi) कात्रज-देहूरोड बाह्य वळण मार्गावर वाकड येथे एका व्यक्तीला धडक दिली. त्यात जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 28) रात्री पावणे दहा वाजता घडला.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन सानप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक सुजित विकास चव्हाण (वय 32, रा. बदलापूर, ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक हा एसटी महामंडळात चालक पदावर काम करतो. त्याने त्याच्या ताब्यातील शिवनेरी बस (एमएच 06/एस94290 बेदरकारपणे चालवली. कात्रज-देहूरोड (Hinjawadi) बाह्यवळण मार्गावरून जात असताना त्याने एका व्यक्तीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Wakad : पार्टटाईम जॉब देण्याच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.