Hinjawadi Rape Case : कॉलेजमधील मैत्रिणीवर बलात्कार; तिच्या पतीला तिचे खाजगी फोटो पाठवून केली बदनामी

एमपीसी न्यूज – कॉलेजच्या मैत्रिणीसोबत वाकड (Hinjawadi Rape Case) येथे परीक्षेसाठी आल्यानंतर एका हॉटेलमध्ये तिच्यासोबत तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान तिचे खाजगी फोटो काढले. ते फोटो मैत्रिणीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत मैत्रिणीवर वेळोवेळी बलात्कार केला. तिचे खाजगी फोटो तिच्या पतीला पाठवले. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अविनाश पांडुरंग करगळ (वय 26, रा. चांदोर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 22 एप्रिल रोजी वाकड आणि थेरगाव येथे घडली.

Maval : पत्नीच्या परस्पर बँकेच्या लॉकरमधून 16 लाखांचे दागिने, भांडी काढली; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे एमसीएचे शिक्षण घेत असताना फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख झाली. त्यानंतर ते वाकड येथे प्रवेश परीक्षेसाठी आले. त्यावेळी वाकड येथील एका हॉटेलमध्ये आरोपीने फिर्यादीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी त्याने फिर्यादीचे खाजगी फोटो मोबाईलमध्ये काढले.

नंतर ते फोटो फिर्यादीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन त्याने फिर्यादीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता आरोपीने दोघांचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादीला डांगे चौक थेरगाव येथील एका हॉटेलवर मे 2022 मध्ये घेऊन जाऊन तीच्यासोबत बळजबरीने संभोग केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत बळजबरीने वेळोवेळी संभोग केला. त्यानंतर फिर्यादी यांचे खाजगी फोटो त्यांच्या पतीला पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी (Hinjawadi Rape Case) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.