Hinjawadi : पावसाळापूर्व कामासाठी हिंजवडी येथील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – मुंबई बेंगलोर महामार्गालगत हिंजवडी (Hinjawadi) येथे भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास सर्विस रोडवर पावसाळापूर्वकाने केली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत 31 मे पर्यंत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिले.

भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास सर्विस रोडवर पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सर्विस रोडवर पाणी जमा होऊन वाहन चालकांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या भागातील पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा करण्यासंबंधी काम करण्यात येणार आहे.

वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल असेल –

सुर्या अंडरपासकडून सर्व्हिस रोडने वाकड नाका मार्गे सयाजी अंडरपासकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक , भुमकर चौक मार्गे ईच्छीत स्थळी जातील.

इंडियन ऑईल चौकाकडून सर्व्हिस रोडने वाकड नाका मार्गे सयाजी अंडरपास व वाकडगावाकडे जाणारी वाहतूक सावतामाळी मंदिर येथून वाकड फ्लायओव्हर ब्रिजवरून ईच्छीत स्थळी जातील.

इंडियन ऑईल चौकाकडून सर्व्हिस रोडने वाकड नाका सयाजी अंडरपास युटर्न वाकड नाका सातारालेन मार्गे हायवे रोडला जाणारी वाहतूक वाकड फ्लायओव्हर ब्रिज वरून वाकडगाव युटर्न घेवून वाकडनाका सातारालेन मार्गे हायवे रोडने इच्छित स्थळी जातील.

Maharashtra : समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी, निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी- मुख्यमंत्री

इंडीयन ऑईल चौक येथून वाकडनाका मार्गे सर्व्हिस रोडने सयाजी अंडरपास मार्गे हायवेला जाणारी वाहने वरील मार्गे न जाता ती कस्तुरी चौक- विनोदे वस्ती भुमकर चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.