Hinjawadi : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने महिलेची 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – युट्युबवर पार्ट टाईम जॉब (Hinjawadi) असून त्यावरील व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून महिलेकडून 11 लाख 67 हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 29 आणि 30 सप्टेंबर रोजी हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9766463538 या क्रमांकावरून बोलणारी मुस्कान नावाची महिला, पूजा कन्स्ट्रक्शन, गुडगाव नावाचा बँक खातेधारक, संदीप किराणा स्टोअर्स, संभलपूर, ओडिशा नावाचा बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 9766463538 या क्रमांकावरून मुस्कान नावाच्या महिलेने संपर्क केला. युट्युबवर पार्ट टाईम जॉब आहे. त्यावरील व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब केल्यास प्रत्येक व्हिडीओकरीता 50 रुपये मिळतील, असे आमिष दाखवले.

Pimpri : ज्येष्ठांना एकाच रुग्णालयात वैद्यकीय सुविधा

त्यानंतर फिर्यादीस गुडगाव येथील पूजा कन्स्ट्रक्शन नावाच्या बँक खात्यात एक लाख 63 हजार रुपये भरण्यास सांगितले. (Hinjawadi) त्यानंतर संभलपूर ओडिशा येथील संदीप किराणा स्टोअर्स नावाच्या बँक खात्यावर 10 लाख चार हजार 668 रुपये भरण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीकडून 11 लाख 67 हजार 668 रुपये घेत त्यांना कोणताही मोबदला न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.