Hinjwadi: वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – वेडीवाकडी मोपेड चालवणार्‍या तरूणाला वाहतूक पोलिसाने अडविल्याने चिडलेल्या तरूणीने पोलिसाला शिवीगाळ करत कानशिलात लगावली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडीतील शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

निखिल चंद्रभान कुंभार (वय 27, रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बाबासाहेब रामचंद्र पावसकर (वय 47) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावसकर हिंजवडीतील शिवाजी चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी मोपेडवरून आलेला आरोपी निखिल मोपेड वेडीवाकडी चालवत असल्याने फिर्यादी यांनी त्याला अडविले. यामुळे चिडलेल्या आरोपीने त्यांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. तसेच ‘तू इथे कसा नोकरी करतो?’ असे म्हणून कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.