Bhosari : वसईतील ऑनर किलरला भोसरीतून अटक

कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आलेला तो तुरुंगात परतलाच नाही

एमपीसी न्यूज – चार जणांची हत्या आणि दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या वसईतील ऑनर किलरला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा मिळाली. दरम्यान तो कोरोना कालावधीत पॅरोलवर बाहेर आला. नंतर तो तुरुंगात परतलाच नाही. ऑनर किलर त्याच्या साथीदारांसोबत शस्त्र विक्रीसाठी भोसरी (Bhosari) परिसरात आला असता त्याच्यासह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Wakad : सामानाची डिलिव्हरी देता देता तो चोरायचा महागड्या सायकली

दिलीप प्रेमनारायण तिवारी (वय 42, रा. इचलकरंजी, ता. हतकणंगले, जि. कोल्हापूर, मुळ रा. उत्तर प्रदेश), चंदनकुमार उर्फ बैजुराय चंदेशवर राय (वय 19, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर, मूळ रा. बिहार), सुगनकुमार जवाहिर राय (वय 18, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर, मुळ रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी हे शस्त्र विक्रीसाठी भोसरी परिसरात येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 82 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक गावठी कट्टा मिळुन आला.

दिलीप तिवारी हा ऑनर किलर असल्याचे तपासातून समोर आले. वसई येथे त्याने चार जणांची हत्या तसेच दोन जणांचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा लागली होती. दरम्यान तो कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आला. त्यानंतर तो कारागृहात परत गेला नाही. तो अवैध शस्त्र विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले.

ही कामगिरी भोसरीचे (Bhosari) वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयणे, पोलिस कर्मचारी सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडीक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुषमा पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Pune : उड्डाणपुलावर चढलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने सुखरूप उतरवले खाली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.