Vallabhnagar News : पाच महिन्यांनी कामावर रुजू झालेल्या एसटीच्या वाहक-चालकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पाच महिन्यानंतर प्रवाशांच्या हितासाठी कामावर रुजू झालेल्या एसटीच्या वल्लभनगर आगार, शिवाजीनगर आगारातील वाहक-चालक व कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे फेटा बांधून, श्रीफळ व फुल देऊन सत्कार करण्यात आला.

सचिन नागणे, राजेश माने,नाना कसबे, राजु बिराजदार,तुषार घाटोले, अशोक लोहकरे, मानिषा वाजे, संजय चव्हांण, अंकुश माने,दिनकर शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. आंदोलनातील मागण्या या टप्प्याटप्प्याने सुटत असतात. एकाच वेळी सर्व मागण्या मान्य होणे शक्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ले व गुण नसलेला वकिल सोडून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संवाद साधल्यास मागण्या मान्य होऊ शकतात. एसटी कर्मचार्‍यांच्या बाबतीत पाच दशकांपासून दीर्घ अनुभव असलेले नेते शरद पवार हेच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात आणि सोडवतील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला.

सुमारे पाच महिन्यापासून प्रवाशांचे हाल होत होते. सोमवारी एका दिवसात राज्यातील 16 हजार 154 एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यात चालक 6669 तर 5786 वाहकाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात 3 हजार कर्मचारी हजर झाले आहेत. आता 1330 फे-या होत आहेत.नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, मुंबई ,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ,पुणे ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पिंपरी-चिंचवड, सोलापूर या ठिकाणचे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. वाहकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 61 हजार 647 एसटी कामगार कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील एसटी प्रवाशी विद्यार्थ्यांच्या , जेष्ठ , महिला प्रवाशी सेवेसाठी सुरू होणार असल्याचे समाधान प्रवाशांमध्ये निर्माण झालेले आहे.

शरद पवार यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले. आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावी. राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण, मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत अनेक कामगार कामावर रुजू होत आहेत, असेही नखाते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.