Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अंध विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने ‘द पूना स्कुल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या 95 अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप, भोजन कार्यक्रम आणि फळ वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शाळेतील अंध विध्यार्थींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. प्रशांत जगताप यावेळी बोलताना म्हणाले, ‘या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. जेवणाचा आनंद घेताना अंध विद्यर्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता’. तसेच माझ्या वाढदिवसाचा हा अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणून माझ्या नेहमी स्मरणात राहील.

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरुनानी म्हणाले.

यावेळी शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर, केदार कुलकर्णी, शेखर तांबे, सौरभ ससाणे, ओंकार शिंदे, सुनील हरळे, किशोर भगत, मधुकर भगत, ऋषिकेश शिंदे, श्रीकांत भालगरे, ऋषिकेश कडू, अजु शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.