Alandi Crime News : ‘तुम्ही गांजा विकता, मी पोलीस आहे’, अशी बतावणी करून शेतक-याची सोन्याची चैन व अंगठ्या पळविल्या

एमपीसी न्यूज – ‘तुम्ही गांजा विकता, मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे’, अशी बतावणी करून शेतक-याची सोन्याची चैन व अंगठ्या पळविल्या. आळंदी, ता. खेड येथे आवारे हॉस्पिटल समोर रविवारी (दि.17) ही घटना घडली.

याबाबत शेतकरी ज्ञानेश्वर धोंडिबा रंधवे (वय 72, रा. चर्होली, मरकळ, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून येत फिर्यादी यांना ‘तुम्ही गांजा विकता, मी पोलीस डिपार्टमेंटचा माणूस आहे’, अशी बतावणी केली. आरोपीने फिर्यादी यांच्या खिशात हात घालून पैसे व मोबाईल बाहेर काढला. तसेच, फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन, दोन अंगठ्या असे एका रूमालात ठेवण्यास सांगितले. आरोपीने तो रूमाल फिर्यादीच्या खिशात ठेवून दुचाकीवरून निघून गेला. फिर्यादीने घरी जाऊन रूमाल पाहिला असता त्यातून सोन्याची चैन आणि दोन अंगठ्या असे 48 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.