Chakan Crime News : विक्रीसाठी गुटख्याची घरात साठवणूक, मुद्देमालासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 46 हजार रूपये किंमतीचा गुटखा आणि 33 हजार 510 रूपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी (दि.18) रात्री 7.10 वा सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, राहुल लल्लुराम तिवारी (वय 29, रा. आंबेठाण, खेड, मुळगाव जालोन, उत्तरप्रदेश) याला अटक केली आहे. तर, ओमप्रकाश उर्फ ओमजी बिष्णोई (वय 45, रा. खालुंब्रे, खेड), रामाराम चौधरी (वय 25, रा. खालुंब्रे, खेड) असे गुन्हा दाखल इतर दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्री करण्याच्या उद्देशाने राहत्या घरात गुटख्याची साठवणूक केली होती. सामाजिक सुरक्षा पथकाने या ठिकाणी छापा टाकून 46 हजार रूपये किंमतीचा गुटखा आणि 33 हजार 510 रूपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. एका आरोपीला अटक केली असून, चाकण पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.