Pune News – वसंत व्याख्यानमाला उद्यापासून सुरू

एमपीसी ऩ्यूज – विविध विषयांवर व्याख्यानांमधून वैचारिक व मनोरंजनाची मेजवानी देणारी वसंत व्याख्यानमाला यंदा ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे.युक्रेन युध्द भारताने काय शिकावे, या विषयावरील ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्या व्याख्यानाने उद्या (गुरूवारपासून) ज्ञानसत्राची सुरूवात होणार आहे. एक ते दहा मे या कालावधीत टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यान प्रत्यक्ष ऎकता येतील.

 

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 148 वर्षांपासून वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुऴे 2020 मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले नव्हते. गेल्या वर्षी व्याख्यानमाला ऑनलाइन झाली होती. यंदा ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने होणार आहे.यामध्ये 21 ते 30 एप्रिल दरम्यानची व्याख्यानमाला ऑनलाइन होणार आहे, तर 1 ते 10 मे दरम्यान प्रत्यक्ष व्याख्याने होणार आहेत.त्याशिवाय 11 ते 20 मे दरम्यान पुन्हा ऑनलाइन व्याख्याने होतील, असे सभेचे प्रमुख कार्यवाहक मंदार बेडेकर यांनी सांगितले.

 

युक्रेन आणि रशिया युध्दाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगऴ्या पैलूंविषयी व्याख्याने होणार आहेत. युक्रेन युध्द आणि माध्यमे यावर 23 रोजी श्रीकांत परांजपे यांचे व्याख्यान होणार आहे. युक्रेन युध्द हवाई क्षेत्राचा वापर आणि अणुयुध्दाचा धोका यावर एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे व्याख्यान होणार आहे. युक्रेन : काल,आज आणि उद्या यावर सुधीर देवरे बोलणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांचे पाकिस्तानविषयी आणि माजी राजदूत गौतम बंबावले यांचे चीनविषयी व्याख्यान होणार आहे. http://youtube.com/c/TMVMass Communication या लिंकव्दारे रोज सायंकाऴी साडेसहाला व्याख्याने ऎकता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.