Todays Horoscope 21 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Todays Horoscope 21 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –
वार – रविवार
 21.5.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- धनिष्ठा नवक समाप्ती.
राहू काळ – सायंकाळी 4.30  ते 6.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी  09.05पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ 21.47 पर्यंत नंतर मिथुन.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
आज आवक जरी मनाजोगती असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. क्षुल्लक कारणांवरून शेजाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका. आज जशास तसे या धोरणाने वागा.

मिथुन ( शुभ रंग- चंदेरी )
आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. अति स्पष्ट बोलण्याने काही हितचिंतकच दुरावतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी.)
आज तुम्ही जसे चिंताल तसे होईल. तुमच्यासाठी आज स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

सिंह (शुभ रंग- पांढरा )
उद्योग धंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकार योग चालूनच येतील. हाताखालच्या लोकांवर तुमचा वचक राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडलेत तर दंड चुकणार नाही.

तूळ ( शुभ रंग- हिरवा)
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज चांगले मित्र ही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकायला हवीत. गाडी चालवताना स्टंट करू नका.

वृश्चिक (शुभ रंग- डाळिंबी )
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपली मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असेल.

धनु- (शुभ रंग- निळा)
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

मकर ( शुभ रंग- क्रीम )
आज तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या धोरणाने वागाल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. सहकुटुंब चैन कराल.

कुंभ (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज परिवारात सामंजस्याचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेणे आज तुम्हाला चांगले जमेल.

मीन -(शुभ रंग – जांभळा )
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.