Alandi : आळंदी नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या बदल्या – नगरविकास विभागाने काढले आदेश

 एमपीसी न्यूज – राज्यभरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपरिषद, नगरपंचायत मधील सर्वच संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या झाल्या असून शुक्रवार दिनांक 19 मे रोजी नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. आळंदी (Alandi)  नगरपरिषद येथे कार्यरत अधिकाऱ्यां पैकी एकूण 7 जणांच्या बदल्या झाल्या आहेत.

Todays Horoscope 21 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

‘कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी’ या संवर्गातील अर्चना पवार यांची भोर नगरपरिषद(पुणे), अक्षय शिरगिरे यांची जेजुरी नगरपरिषद (पुणे), रामराव खरात यांची माळेगाव नगरपंचायत (पुणे) येथे बदली झाली आहे.

लेखापाल व लेखापरीक्षक संवर्गातील विशाल बासरे यांची पोलादपूर नगरपंचायत (रायगड) , देवश्री कुदळे यांची खंडाळा नगरपंचायत (सातारा) येथे बदली झाली आहे. विद्युत अभियांत्रिकी सेवा संवर्गातील साधना शिंदे यांची राजगुरूनगर नगरपरिषद (पुणे) येथे तर संगणक अभियांत्रिकी सेवा संवर्गातील आरती पाटील यांची चाकण नगरपरिषद (पुणे) येथे बदली झाली आहे.

शनिवार दिनांक 20 मे रोजी या सर्व अधिकाऱ्यांचा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व पुढील शासकीय सेवेतील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्वांना आळंदी (Alandi) नगरपरिषदे ची आठवण म्हणून तुळशीचे रोप देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.