Sinhgad Road : कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : आता दुरुस्तीचे काम केल्यानंतर त्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला चार ते पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने मेकॅनिकचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. रईस अमीन शेख (वय 30, रा. मानाजी नगर नवदीप सोसायटी नऱ्हेगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रस्ता (Sinhgad Road) पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : मुळा नदी काठच्या वृक्षांची वृक्षप्रेमी रविवारी करणार गणना

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रईस शेख हा मेकॅनिक आहे. त्याने घराशेजारीच राहणाऱ्या नौशाद फारुख शेख याच्या ऑटो दुरुस्तीची काम केले होते. दरम्यान पैसे मागण्यासाठी तो घरी गेला असताना नौशाद शेख अल्ताफ शेख मदिना शेख यांनी रईस व अनिश शेख यांना जबरी मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रईस याला 17 मे रोजी पहाटेच्या सुमारास नवले हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान रईस याला टीबीचा आजार होता. मारहाणीत त्याच्या छातीवर ठोसा लागल्याने तो बेशुद्ध झाला होता. (Sinhgad Road) त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.