Pune : पुण्याहून अष्टविनायक यात्रेला निघालेल्या बसला भीषण अपघात: 5 जखमी

एमपीसी न्यूज :  पुणे (Pune) शहरातून अष्टविनायक यात्रेसाठी निघालेल्या एका खाजगी बसला लोणीकंद गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sinhgad Road : कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू

याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) काही प्रवाशांना घेऊन खाजगी बस पुणे नगर महामार्गावरून अष्टविनायक दर्शनाला निघाली होती. रांजणगावच्या दिशेने जात असताना या बसला लोणीकंद गावाजवळ अपघात झाला.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत. लोहगाव शिक्रापूर आणि वाघोली येथील रुग्णालयात या प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या खाजगी बस मध्ये नेमके किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी लोणीकंद पोलीस दाखल झाले असून क्रेनच्या साह्याने बस बाजूला काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.