Pune : सासू आणि तिच्या मित्राचे अश्लील फोटो तयार करून नातेवाईकांना पाठवले; जावयावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यात (Pune)  घरगुती वादातून जावयाने सासू आणि तिच्या मित्राचे चेहरे वापरून नग्न फोटो तयार केले. त्यानंतर ते फोटो नातेवाईकांना पाठवून त्यांची बदनामी केली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी संबंधित जावयावर आयटी ऍक्टसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या पत्नीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च महिन्यात घडला.

Pune : पुण्याहून अष्टविनायक यात्रेला निघालेल्या बसला भीषण अपघात: 5 जखमी

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. मात्र, काही कारणास्तव सध्या ते वेगवेगळे राहत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपीने फिर्यादी पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केला.

तसेच फिर्यादीच्या आईचे आणि तिच्या मित्राचे चेहरे वापरून नग्न फोटो तयार केले. हे फोटो त्यांनी फिर्यादीच्या आत्याच्या मोबाईलवर पाठवले.

या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने (Pune) आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.