Pune : अभ्यास करत नाही म्हणून आईने मारल्याने मुलाने घर सोडले

एमपीसी न्यूज : अभ्यास करत नसल्यामुळे आईने थोबाडीत मारल्यामुळे मुलगा घर सोडून निघून गेला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फातिमानगर येथील इजिना टावर सोसायटीतून ही घटना घडली. आईने मारल्याचा राग मनात धरून पंधरा वर्षे मुलगा घर सोडून निघून गेला. दोन दिवस झाले तरी तो बेपत्ता आहे.

Pune : सासू आणि तिच्या मित्राचे अश्लील फोटो तयार करून नातेवाईकांना पाठवले; जावयावर गुन्हा दाखल

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा 15 वर्षीय मुलगा अर्षद हा अभ्यास करत नव्हता. त्यामुळे आईने रागाच्या भरात त्याच्या थोबाडीत मारल्या.

आईने मारल्याचा राग आल्याने अर्षद 19 मे रोजी सायंकाळी सहा वाजता घरातून निघून गेला. तो अद्याप घरी परत आला नाही. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी पत्ता झालेल्या या मुलाचा सध्या शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.