Pune : पतीकडून चारित्र्यावर संशय, 59 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : चारित्र्यावर संशय घेऊन पती मारहाण करत असल्याने 59 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर (Pune)  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोंधळी नगर परिसरात 17 मे रोजी ही घटना घडली. अनिता नागनाथ हिवराळे (वय 59) असे आत्महत्या केलेल्या महिलेची नाव आहे. मयत महिलेचे पती नागनाथ हिरा हिवराळे (वय 65) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : अभ्यास करत नाही म्हणून आईने मारल्याने मुलाने घर सोडले

मयत महिलेची मुलगी सारिका दिनेश खरात (वय 30) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नागनाथ हिवराळे हे पत्नी अनिता हिवराळे यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करायचे. या मारहाणीला कंटाळून आणि शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अनिता हिवराळे यांनी 17 मे रोजी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली. हडपसर (Pune)  पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.