IPL 2023: केकेआरवर एक धावांनी रोमहर्षक मात करत लखनऊ सुपर जायंट्स प्ले ऑफ साठी ठरले पात्र.

रिंकू सिंगची झंझावाती खेळी ठरली व्यर्थ

एमपीएससीन्यूज: (विवेक कुलकर्णी)कोलकाताच्या ईडन गार्डनवर केकेआरला पराभूत करणे हे खूप अवघड काम मानले जाते, त्यातच लाखो उपस्थित प्रेक्षकांनी रिंकू रिंकू चा केलेला जयघोष आणि त्याने लढवलेली खिंड यामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या नाकी तोंडी पाणी आले होते, नवोदित यश ठाकूरने या कठीण प्रसंगी नो बॉल ,वाईड बॉल टाकून दडपण किती आहे ते दाखवले खरे,पण तरीही त्याने किमती एक धाव रोखली आणि लखनऊ सुपर जायंट्सने चित्तथरारक विजय मिळवून प्ले ऑफ मध्ये प्रवेश (IPL 2023)करण्यात यश मिळवले.

Pune : अभ्यास करत नाही म्हणून आईने मारल्याने मुलाने घर सोडले

कोलकाता येथे झालेल्या कालच्या दुसऱ्या सामन्याला केकेआर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात लढत झाली.केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

लखनऊ संघाची सुरुवात खराब झाली असली ,एक बाद 14 ते 5 बाद 73अशी बिकट परिस्थिती झाली तरीही नंतर त्यांनी निकोलस पुरनच्या झंझावाती खेळीच्या जोरावर 8 बाद 176 धावांची मोठी मजल मारली. पुरनने पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध करत केवळ 30 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकार मारत 58 धावा केल्या, त्याला आयुष बदोनी,डीकॉक,मंकड यांचीही चांगली साथ मिळाली.

केकेआरला आपल्या प्ले ऑफच्या पात्रतेसाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते.त्याचदृष्टीने त्या जोरदार फटकेबाजी करत चांगली सलामी दिली.रॉय आणि अय्यर ही जोडी चांगली खेळत असतानाच आधी अय्यर,मग कर्णधार राणा,गुरबाज ही मोठी नावे संघाला विशेष योगदान न देता बाद झाल्याने संघ अडचणीत आला,त्यातच रसेलही आला अन गेला पण तरीही त्यांनी आशा सोडली नाही, कारण अल्पकालावधीतच प्रचंड लोकप्रिय झालेला अन आपल्या धडाकेबाज खेळीने कितीही मोठ्या गोलंदाजांना फोडून काढणारा रिंकू सिंग अद्यापही शाबीत होता, अन त्याने त्या किर्तीला जागत अतिशय जबरदस्त अन एक अविस्मरणीय खेळी करत कोलकाताच्या ईडन गार्डनवर उपस्थित असलेल्या आणि प्रक्षेपणाच्या माध्यमातून सामना बघणाऱ्या अगणित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले,रिंकची आयपीएल कामगिरी आणि कारकीर्द अतिशय छोटी असली तरी त्याने केलेल्या धडाकेबाज खेळीने तो अतिशय मोठा खेळाडू असल्याचे सिद्ध होत आहे,त्याचे टेम्परामेन्ट ,त्याची शांत देहबोली अन आकर्षक पण आक्रमक शैली मनाला आणि डोळ्यालाही खूप भावते, त्याने कालही जबरदस्त फलंदाजी करत शब्दश: लखनऊच्या घशातून घास काढावा तसा काढला होताच,पण युवा यश ठाकूरने शांत डोके ठेवत गोलंदाजी केल्याने केकेआरला एकच पण अतिशय मौल्यवान धाव कमी पडली, अन लखनऊ संघाने एकच जल्लोष करत प्ले ऑफ मधे जागा पक्की झाल्याचा आनंद साजरा(IPL 2023) केला.

गुजरात,चेन्नई,आणि आता लखनऊ हे तीन संघ पात्र ठरल्याने आता चौथा संघ कोणता याची प्रंचड उत्सुकता सर्वानाच लागून राहिलेली(IPL2023) आहे.

संक्षिप्त धावफलक

लखनऊ सुपर जायंट्स

8 बाद 176

पुरन 58,बदोनी 25,मंकड 26

अरोरा 28/2,नारायण 30/2

विजयी विरुद्ध

कोलकाता नाईट रायडर्स

7 बाद 175

रॉय 45,अय्यर 24,रिंकू नाबाद 67

बिष्णोई 23/2,ठाकूर 31/2

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.