Pune: कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकवून व्यापाऱ्यास खंडणी मागणारा जेरबंद

एमपीसी न्यूज –  कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकवून व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली. ही कारवाई पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस परिसरात केली.

श्रीनाथ यलाप्पा शेडगे (वय 25 रा. माळशिरस, सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. शेडगे हा पेशाने मजूर आहे.

शेडगे याने कोरगाव पार्क येथे एका गाडीवर चिठ्ठी चिटकवून त्यात खंडणी मागितली होती. याप्रकरणी कोरोगाव पार्क (Pune) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करत असताना आरोपी हा त्याच्या मुळ गावी सोलापूर जिल्ह्यात लपून बसला असल्याची खबर मिळाली.

Chakan News: भोसे येथे गोळीबारात तरुण गंभीर जखमी; दोघा भावांना पिस्तुलासह अटक

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक त्याच्या गावी दाखल झाले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. त्याला कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून आरोपीन गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई  वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, अमोल सरडे , गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण,  उत्तम तारू, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, मोसिन शेख, नागनाथ राख या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.