Talegaon Dabhade : एनएमएमएस परीक्षेत ॲड् पु. वा. परांजपे विद्यालयाचे यश

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) तळेगाव दाभाडे येथील ॲड् पु. वा. परांजपे विद्या मंदिरने घवघवीत यश मिळवले.शाळेतील शुभम संताजी माळी या विद्यार्थ्याने खुल्या गटातून अकराव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तर विद्यालयाचे पाच विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत वार्षिक 12 हजार रुपये प्रमाणे चार वर्षात शिक्षणासाठी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांच्या नेतृत्वाखाली विभाग प्रमुख दुर्गा भेगडे, दीप्ती बारमुख, वर्षाराणी गुंड यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे नू.म.वि.प्र.मंडळाचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री), उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव व शालेय समितीचे अध्यक्ष  नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.