E-bus depot inauguration : पीएमपीएमएलच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उदघाटन, 90 ई-बसेस सवेते होणार दाखल

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे येत्या शुक्रवारी (दि.2 सप्टेंबर) उद्घाटन होणार असून यावेळी 90 ई-बसेस चा लोकार्पण सोहळा ही होणार आहे.(E-bus depot inauguration) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या पुणे स्टेशन ई-बस डेपोतून 15 विविध मार्गांचे 90 शेड्यूलव्दारे नियोजन करण्यात आले आहे. सदरच्या ई-बसेस हिंजवडी माण फेज 3, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत.(E-bus depot inauguration) पुणे स्टेशन डेपोमध्ये बसेसच्या चार्जिंगसाठी 45 AC/DC चार्जर बसविलेले आहेत. तसेच प्रति दिन प्रति बस 225 कि.मी. प्रमाणे बस संचलनाचे नियोजन असणार आहे.

Crime News : भांडण सोडवणे दाम्पत्याला पडले महागात, टोळक्याकडून बेदम मारहाण

तसेच यावेळी केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 150 ई-बसेस पैकी 90 ई-बसेसचा लोकार्पण सोहळा होणार आहे.(E-bus depot inauguration) केंद्र शासनाच्या फेम-2 योजनअंतर्गत प्राप्त होणाऱ्या 150 ई-बसेससाठी प्रति बस 55 लाख रूपये प्रमाणे सबसिडी केंद्र सरकारने दिलेली असून या ई-बसेस जीसीसी तत्वावर चालविल्या जाणार आहेत. या ई-बसची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये 12 मी. लांबी, आसन क्षमता 33, संपूर्ण वातानुकुलित, दिव्यांगांसाठी खास सुविधा आयटीएमएस, मोबाईल चार्जिंग सुविधा अशी आहेत.

केंद्र सरकारने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीए परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बसेसना प्राधान्य दिलेले असून नागरीकांना वातानुकुलित आरामदायी, ध्वनी विरहीत, किफायतशीर बस सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळास सबसिडी मंजूर केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.