Pune : दहाव्या रंगूनवाला ‘सेव्हन-ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

हॉटेल इंडस्ट्रीतील १२ संघांचा सहभाग 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम.ए. रंगूनवाला इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’तर्फे  एम. ए. रंगूनवाला ‘सेव्हन -ए-साईड’ फुटबॉल स्पर्धेचे ३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता आझम कॅम्पस मैदानावर उद्घाटन झाले. आंतरराष्ट्रीय खेळाडू सुरोजित बोस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. हॉटेल मॅनेजमेंट संस्था आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील १२ संघांचा सहभाग या स्पर्धेत आहे. 

जे डब्ल्यू मेरियट,कॉनराड पुणे,भारती विद्यापीठ हॉटेल मॅनेजमेंट,फोर पॉईंट्स शेरेटन,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुम्बा, एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट, सिम्बायोसिस, डी. वाय. पाटील इन्स्टीट्यूट, मेरियट सूट्स, व्हायकॉम, अँब्रोसिया या संघानी भाग घेतला आहे.

पहिल्या दिवशी डी वाय पाटील  इन्स्टिट्यूटने उपउपांत्य फेरीत प्रवेश केला तर सिम्बायोसिसने  कॉनरॅड पुणे संघावर २-० अशी मात करून उप उपांत्य फेरीत प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.