Ind Vs Eng Test Series : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव 192 धावांवर आटोपला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 72 धावा केल्या. जॅक लीचने 4 तर जेम्स अँडरसनने 3 बळी संघासाठी विजयाचा मार्ग सोपा केला.

कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी गिल आणि पुजाराने डावाची सुरवात केली. पुजारा 15 धावा करून लिचच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली सोबत गिलने डावात रंगत आणली. याच वेळेत गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले, पण तो अ‍ॅन्डरसनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने 50 धावा केल्या. त्यानंतर आलेला रहाणे भोपळाही न फोडता अ‍ॅन्डरसनच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर संघाला गळती सुरू झाली आणि कोहली सोबत क्रिजवर फारकाळ टिक धरू शकले नाहित. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 72 धावा केल्या.

_MPC_DIR_MPU_II

इंग्लंडकडून लिचने 4, जेम्स अ‍ॅन्डरसन 3, आर्चर, बेस आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 1-1-1 बळी घेतला. जो रुट याच्या नेतृत्व शैलीनं इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. गोलंदाजाचा योग्य पद्धतीनं वापर केला. शिवाय पहिल्या डावांत मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतरही फॉलोऑन देण्याचा निर्णय न घेता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान असे अनेक निर्णय घेत जो रुटनं इंग्लंडला विजय मिळवून दिला.

इंग्लंड पहिला डाव– सर्वबाद 578
भारत पहिला डाव– सर्वबाद 337
इंग्लंड दुसरा डाव– सर्वबाद 178
भारत दुसरा डाव– सर्वबाद 192

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.