Ind Vs Eng Test : लॉर्डसवर भारताचा बोलबाला ! इंग्लंडवर 151 धावांनी विजय, मालिकेत 1-0 आघाडी 

एमपीसी न्यूज – भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसामुळे भारत विजयाला मुकला. पण, दुसऱ्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी दाखवत 151 धावांनी सामना जिंकला आहे. यासह भारताला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. 

कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला 60 षटकात 272 धावांचे आव्हान मिळाले होते, पण भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज 51.5 षटकात 120 धावांत गारद झाले. भारताकडून मोहम्मद सिराजने 4, इशांतने 3 तर मोहम्मद शमीने 2 बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.

मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा 151 धावांनी धुव्वा उडवला आहे. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीर ठरला.   भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.