Ind Vs Eng Test Series : जो रूटचा डबल धमाका, इंग्लंडची धावसंख्या पाचशे पार

एमपीसी न्यूज – कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरूद्ध धावांचा डोंगर उभारला आहे. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 8 बाद 555 धावांपर्यंत मजल मारली. सध्या जॅक लिच (6) व डॉमिनिक बेस (28) धावांवर खेळत आहेत.

दुस-या दिवशी जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी खेळाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी 92 धावांची भर घातली. बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना 82 धावांवर तो झेलबाद झाला. रूटने दमदार खेळी करत द्विशतक झळकावले.

शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रूट 218 धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (34), बटलर (30) हे झटपट बाद झाले.

_MPC_DIR_MPU_II

भारताकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर. आश्विन, शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रोहित शर्मा आणि वॉशिंगटन सुंदर यांना एकही बळी मिळाला नाही. तिस-या दिवशी समाना कुठे जाणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.