IND vs NED : कोहली ,सूर्यकुमार ,रोहीत मुळे भारताने नेदरलँड पुढे ठेवले मोठे लक्ष्य

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर मिळवलेल्या चित्तथरारक विजयाने कमालीचा आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने नेदरलँड संघापुढे 180 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.सिडने येथे झालेल्या आजच्या भारतीय संघाचा दुसरा सामना नेदरलँड संघाविरुद्ध (IND vs NED) झाला,ज्यात भारतीय कर्णधार रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पाकिस्तानला मात देणारा विजयी संघच कायम ठेवला.

रोहीतला साथ द्यायला आलेल्या के एल राहुलला आजही फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही.केवळ वैयक्तिक 9 धावांवर असताना तो मिकरेनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.फलंदाजीत सातत्य न ठेवणे राहुलसाठी पुढे अवघड ठरू नये म्हणजे झाले. तो बाद झाल्यानंतर आला तो मागच्या सामन्याचा नायक विराट कोहली. त्याने कर्णधार रोहीतला चांगली साथ देताना दुसऱ्या गड्यासाठी 56 चेंडूत 73 धावांची चांगली भागीदारीही केली.

Electricity bill : साप्ताहिक सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरु; वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

या भागीदारी दरम्यान कर्णधार रोहीतने आपले टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातले 29 वे अर्धशतक पूर्ण करुन योग्य वेळी फॉर्मात येत असल्याचे दाखवून दिले. रोहीतने 39 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकार मारत 53 धावा ठोकल्या. अर्धशतक झाल्यानंतर रोहित लगेचच बाद झाला,(IND vs NED) मात्र तो बाद झाल्याने झालेले दुःख सुर्यकुमार यादवने खूप हलके करुन टाकताना संघाला सुस्थितीतही आणून ठेवले.त्याने कोहलीसोबत केवळ 48 चेंडूत 95 धावांची वेगवान भागीदारी करताना संघाला 179 धावांची मोठीच मजल मारून दिली.

 

खराब फॉर्माला मागे सोडून लयीत आलेल्या विराटने आपल्याला रणमशिन का म्हणतात हे सप्रमाण सिध्द करताना सलग दुसरे अर्धशतक ठोकताना जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शनही केले.त्याने केवळ 44 चेंडूत नाबाद 62 धाव ठोकताना 3 षटकार आणि चार चौकार मारले. (IND vs NED) त्याला साथ देताना खरी कमाल केली ती नवीन सेन्सेशन म्हणून अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या सुर्यकुमार यादवने.त्याने केवळ 25 चेंडूतच वेगवान अर्धशतक ठोकून नेदरलँडच्या गोलंदाजांचे चांगलेच घामटे काढले.यात 7 चौकार आणि शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर मारलेला उत्तुंग षटकार सामील होता.या घणाघाती फलंदाजीमुळे भारतीय संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात 179 धावा जमा करुन नेदरलँड संघापुढे विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.