Beaten case : जुन्या भांडणाच्या रागातून आई व मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून एकाने (Beaten case) चामडी बेल्टने आई व मुलाला मारहाण केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.25) जुनी सांगवी येथे घडला.

शेखर राहूल तांबे (वय 35 रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली असून सुजल गील (पुर्ण नाव वय माहिती नाही, रा. जुनी सांगवी) याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला आहे.

IND vs NED : कोहली ,सूर्यकुमार ,रोहीत मुळे भारताने नेदरलँड पुढे ठेवले मोठे लक्ष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोही हा फिर्यादीचा तोंड ओळखीचा आहे, फिर्यादी हे किराणा घेऊन घरी जात असताना आरोपीने चामड्याच्या पट्ट्याने मारले.(Beaten case) थोड्या वेळाने आोरोपी फिर्यादीच्या घरी आला व त्याने  फिर्यादीच्या आईलाही चामड्याच्या पट्टयाने मारहाण केली फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करत जखमी केले.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.