Pimple gurav crime : किरकोळ कारणावरून टेम्पो चालकास मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून चार जणांनी टेम्पो चालकाला (Pimple gurav crime) व त्याच्या भावाला मारहाण केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.25) पिंपळे गुरव येथे घडली.

अनिकेत विठ्ठल गुंजाळ (वय 26 रा.आंबेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beaten case : जुन्या भांडणाच्या रागातून आई व मुलाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमध्ये तरकारी घेऊन जात होते. यावेळी काहीजण सार्वजनीक रस्त्यावर फटाके फोडत होते.यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो हा बाजूने घऊन जात होते. यावेळी एकाने दगडाने कानावर मारून जखमी केले.(Pimple gurav crime) पुढे जाऊन टेम्पो थांबवला असता आरोपींनी फिर्यादीच्या टेम्पो जवळ येत फिर्यादी व त्यांचा भाऊ अखिलेश यांना मारहाण केली व टेम्पोची काच फोडून नुकसान केले. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.