IND Vs SL T20 : भारत श्रीलंका दरम्यान T20 चा थरार आजपासून, ऋतुराज गायकवाड़ला संधी मिळणार का ? 

एमपीसी न्यूज – भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आज रविवारपासून तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यास सज्ज आहे. या मालिकेत डावखुरा सलामीवीर देवदत्त पडिकल, चिंचवडचा ऋतुराज गायकवाड आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिकेत भारताकडून एकूण सात जणांनी पदार्पण केले. रविवारपासून सुरू होणा-या T20 मालिकेत निश्चितपणे भारताचेच पारडे जड आहे. दरम्यान, आगामी T20 विश्वचषकाच्या दृष्टीने उपलब्ध खेळाडूंची चाचपणी करण्याची अखेरची संधी भारताकडे आहे.

पहिल्या सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचे पदार्पण निश्चित मानले जात आहे. आयपीएलमध्ये वरुणने कामगिरीची चुणूक दाखविली आहे.तो खराब फिटनेस आणि जखम यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा करू शकला नव्हता. ऑफ ब्रेक, कॅरम बॉल टाकणारा आणि लेगब्रेकचा प्रयत्न करणारा वरुण चक्रवर्ती याचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

 या संघातून निवडणार ‘प्लेईंग ईलेव्हन’

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन (यष्टिक्षक), संजू सॅमसन (यष्टिक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन 1,3 (हिंदी)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.