India vs Bangladesh Match : भारतीय संघ विजयी चौकार मारणार की बांगलादेश अडथळा आणणार?

एमपीसी न्यूज ( विवेक कुलकर्णी) : रोहितचा संघ विजयी चौकार ( India vs Bangladesh Match ) मारणार की बांगलादेश संघ त्यात अडथळा ठरून धक्का देणार याच यक्ष प्रश्नाकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेले आहे.

मागील काही वर्षात भारतीय संघाची कामगिरी कमालीची यशस्वी ठरली आहे. विश्वविजेता ऑस्ट्रेलियन संघ असो वा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, भारतीय संघाच्या विजयी वारूला कोणीही अडवू शकलेले नाही, हा यात काही खबळजनक अपवाद होते. नाही असे नाही, नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला साखळी सामन्यात एका पराभवाचा सामना करावा लागला होता.

तो याच बांगलादेश संघाकडून 2007 च्या विश्व कप स्पर्धेत तर भारतीय संघाला साखळी फेरीतच पराभूत करत बांगलादेश संघाने सर्वानाच आश्चर्यचकित केले होते, इतिहास वारंवार घडत नसतात हे मान्य केले तरीही भारतीय संघ कुठल्याही प्रकारचा गाफीलपणा करणार नाही, असेच सध्या तरी सर्वानाच वाटत आहे.

पुण्यात आज होणाऱ्या गहूंजे येथील एमसीएच्या आलिशान मैदानावर आजची लढत होणार आहे. दिवसरात्र खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी तमाम पुणेकर उत्सुक आहेत ते आपल्या लाडक्या  आणि जगभरातल्या क्रिकेट पंडितांनी या विश्वकप स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून पहिली पसंती देणाऱ्या भारतीय संघाच्या चौथ्या विजयाचे याची देही याची डोळा साक्षीदार होण्यासाठी.

पहिल्या सामन्यापासूनच विजयी मार्गावर डौलात चालणाऱ्या भारतीय ( India vs Bangladesh Match ) संघाचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. कर्णधार रोहितसह ,कोहली, राहुल, श्रेयस यांच्या बॅटसमधून  धावा निघत आहेत . तर दुखापतीनंतर संघात परतलेला बुमराह अधिक तंदुरुस्त तसेच कणखर झालेला आहे आणि तो कमालीचा यशस्वीही ठरत आहे. कुलदीप यादवने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने संघनायकाचा आपल्यावरील विश्वास द्विगुणित केलेला आहे.

Pimpri : ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ उपक्रमांतर्गत सुचेता गटणे यांचा सन्मान

एकंदरीतच हा संघ अतिशय तुल्यबळ वाटत आहे. फक्त एकच उत्सुकता वा आशंका हीच आहे की भारतीय क्रिकेटचा भावी राजकुमार म्हणून ओळखला जाणारा शुभमन गील आज खेळणार की नाही? पहिले दोन सामने डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे बाहेर बसलेल्या गील ने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात छोटी पण शानदार खेळी करुन सुरुवात चांगली केली होती.

पण तो मोठी खेळी करू शकण्यात यशस्वी ठरला नव्हता. त्याला कारणीभूत ठरले होते त्याचे पूर्ण फिट नसणे.  त्यामुळेच आपल्या या हुकमी अस्त्राला भारतीय संघ पूर्णपणे तंदुरुस्त होवू द्यावे असे ठरवत असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही असे ऐकण्यात आलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ईशान किशनला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बांगलादेश संघासाठी अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शकीब आज बहुतेक ( India vs Bangladesh Match ) खेळणार नाही असे बोलले जाते आहे. या वर्ल्डकप मधे तळ्यातमळ्यात अशी कामगिरी करणाऱ्या बांगलादेश संघासाठी हा मोठाच धक्का आहे. आपल्या तीन सामन्यात दोन वेळा पराभूत झालेल्या बांगलादेश संघासाठी विजय अत्यावश्यक असल्याने ते जोरदार लढत देतील अशीही शक्यता आहे.

त्यांचा भारतीय संघाविरुद्ध फारसा निभाव लागत नाही हे जरी सिद्ध झालेले असले तरी बांगलादेशचे खेळाडू नेहमीच भारतीय संघाविरुद्ध खेळताना उन्माद दाखवतात . तो आज पुन्हा एकदा भारतीय संघ उतरवणार की भारतीय संघाच्या विजयी रथाची वाटचाल बांगलादेश संघ रोखणार हे बघणे औत्सुक्याचे असेल.

पुण्यात मागील काही दिवसांपासून असलेले ढगाळ आणि दमट वातावरण सामन्यात काही अडथळा आणू नये यासाठी तमाम क्रिकेटरसिक पुण्यातल्या विविध देवाकडे प्रार्थना करत असतीलच, त्याला 100% यश मिळो आणि भारतीय संघाचा आणखी एक शानदार विजय बघण्याचा आनंद आज मिळो हीच तमाम क्रिकेटप्रेमींची अपेक्षा ( India vs Bangladesh Match ) असणार, नाही का?

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.