Pune : आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत इंदिरा महाविद्यालय विजयी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा (मुले) या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या लोणावळा संकुलामध्ये पार पडल्या.

पुणे जिल्हा क्रीडा विभागातील महाविद्यालयाचे एकूण 40  संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स ताथवडे आणि टी. जे. कॉलेज खडकी यांच्यात झाला. यामध्ये इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स या संघाने ५-० अशा सरळ गुणाने अंतिम सामन्यात विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावण्यासाठी ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग वाघोली व डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आकुर्डी या दोन्ही संघांमध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डी या संघाने १-० गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन एस.आय.टी. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका वैशाली जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले तसेच पुणे जिल्हा क्रीडा समिती मार्फत प्रा. संतोष पाचारणे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.