Pimpri News : शाईफेक प्रकरणानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या तर 11 पोलीस निलंबीत

एमपीसी न्यूज  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (दि. 10) झालेल्या शाईफेकीनंतर रविवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीसांच्या (Pimpri News) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून अकरा पोलीस कर्मच्याऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत रविवारी (दि.11) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले.

पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना विशेष शाखा एक येथे संलग्न करण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्याचा प्रभार पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्याकडे देण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित यांना चिंचवड पोलीस ठाण्यात संलग्न करण्यात आले आहे. तर चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना पिंपरी वाहतूक विभागात संलग्न केले आहे. प्रशासकीय व बंदोबस्ताच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

FDA : रुग्णांना आता रुग्णालयाच्या औषध दुकानातून औषधे खरेदीची सक्ती नाही

पालकमंत्र्यां वरील शाईफेक प्रकरण पोलिसांवर देखील शेकले आहे. या प्रकरणात शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ,(Pimpri News) पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, महिला पोलीस नाईक कांचन घवले, महिला पोलीस शिपाई प्रियांका गुजर यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा एका माध्यम प्रतिनिधीला ताब्यात घेतले होतें. तपासानंतर त्यांना सोडण्यात आले होते. या प्रकरणात चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. रविवारी सायंकाळ पर्यंत पोलीस कुठल्याही निष्कर्षावर पोहोचले नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.