Innovative World School : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरीसोबत

एमपीसी न्यूज : चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड (Innovative World School) स्कूलचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मावळ तालुक्यातील गोवित्री, उंबररवाडी व नानोली येथील आदिवासी पाड्यावर कातकरी लोकांबरोबर दीपावली साजरी केली.

समाजातील वंचित, गोरगरीब, आदिवासी लोकांना वेळोवेळी मदत करण्याची आपली संस्कृती मुलांमध्ये रुजवावी म्हणून इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कातकरी लोंकाबरोबर दीपावली साजरी केली.

आदिवासी कुटुंबियांना बासमती तांदूळ, डाळ, फराळ, मिठाई, साबण, पणत्या आदीं साहित्यांचे वाटप केले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे, सुका मेवा आदी देणेत आले.

आदिवासी महिलांची डॉक्टरांनी तपासणी केली. शरीर स्वास्थ आणि निरोगी राहण्यासाठी प्रोटिनयुक्त पदार्थांची उपलब्ध अन्नातून कशी आवश्यकता पूर्ण करता येते याची माहिती आणि आरोग्य सल्ला दिला.

इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या संचालिका कमला बिष्ट यांनी (Innovative World School) शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गोरगरिबांकरिता मदत करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मदतीचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले.

समाजातल्या उच्चभ्रू लोकांनी पुढे येऊन समाजातल्या गरिबांना नेहमी मदत करावी असे आमच्याशी बोलताना सांगितले.

इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी मुलांबरोबर नृत्य करून आनंद साजरा केला.

नानोली गावात पाणी, वीज, रस्ते आदी सोई नसतानाही धडपडत जीवन कंठीत असलेल्या लोकांना पाहून इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.

सर्व विद्यार्थ्यांनी ठरविले की, प्रत्येक वर्षी आम्ही सर्व जण येऊन यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार आणि या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणार अशी प्रतिज्ञा घेऊन जड अंतःकरणाने निरोप घेतला.

Poultry Business : कुक्कुट पक्ष्यांची पूजा करत पोल्ट्री व्यावसायिकांची दिवाळी साजरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.