Poultry Business : कुक्कुट पक्ष्यांची पूजा करत पोल्ट्री व्यावसायिकांची दिवाळी साजरी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पोल्ट्री (Poultry Business) व्यावसायिकांनी सहकुटुंब कुक्कुट पक्ष्यांची पूजा करत दिवाळी साजरी केली. पोल्ट्री शेडवर आकर्षक विद्युत रोषणाई करून फटाक्यांची अतिशबाजी केली. शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री व्यवसाय हा मोठा आधार आहे.  
मावळ तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी बांधवानी पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेले आहेत.  सुमारे एक हजार पोल्ट्री व्यावसायिक मावळ तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय  करीत असल्याचे पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी सांगितले.
प्रत्येक पोल्ट्री उद्योजकांनी आपल्या पोल्ट्रीत सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पोल्ट्री शेडची पूजा करुन काही जणांनी पोल्ट्रीवर विजेची रोषणाई तसेच फुलांची सजावट केली होती. सायंकाळी आपल्या पोल्ट्रीतील पक्षांची पूजा केली व पेढे वाटप केले.

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बंधाले यांनी सर्व पोल्ट्री उद्योजकांनी हा सण साजरा करावा असे आवाहन केले होते.
मावळ तालुक्यातील दुग्ध  व्यावसायिकांनी आपल्या (Poultry Business) गोठ्यातील गाई- म्हैसीची पूजा केली. काही उद्योजकांनी आपल्याकडील मजुरांना पूर्ण पोषाख व मिठाई तसेच भेटवस्तू  देऊन सन्मान केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.