Diwali : दिवाळी पाडवा व भाऊबीज शहरात सर्वत्र उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : यंदा दिवाळीचा (Diwali)पाडवा आणि भाऊबीज  शहरात सर्वत्र ठिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.

पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांनी आपल्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन केले. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून दिवाळी पाडव्याकडे पाहिले जाते. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो.

तर दिवाळी भाऊबीजनिमित्त बहिण (Diwali)आपल्या भावाला ओवाळते. त्यानंतर भाऊ बहिणीला खास भेट म्हणजे ओवाळणी देतो. भाऊबीज ही लहानापासून ज्येष्ठापर्यंत शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा बुधवार 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. आळंदीमध्ये दिवाळी पाडव्या निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात व श्री भैरवनाथ मंदिरात बुधवारी सायंकाळी पणत्या लावून मोठ्या उत्साहात दिवाळी दिप उत्सव साजरा करण्यात आला.

Moshi Crime : ऐन दिवाळीत कोयत्याने वार करत तरुणाचा खून, चार आरोपींना अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.