Moshi Crime : ऐन दिवाळीत कोयत्याने वार करत तरुणाचा खून, चार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून तरुणाचा टोळक्याकडून (Moshi Crime) कोयत्याने वार करत पवन लष्करे याचा खून करण्यात आला आहे. ही घटना मोशी येथे 25 ऑक्टोबर रोजी अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोन्या उर्फ परशुराम जाधव (वय 21 रा.चिंचवड), गणेश शिंदे (वय.22 रा. चऱ्होली), साहिल म्हस्के (वय 22 रा.चिंचवड) व राजू दोडमाने (वय 22 रा.पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे असून अत्रय काळे (वय 23 रा.चाकण) 4 ते 5 अनोळखी इसम व एका अल्पवयीन मुलावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज रामदास मोहिते (वय 21 रा.चिंचवड) याने फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्याचा मित्र पवन लष्करे (Moshi Crime) व करण वंजारे हा मोशीतील शिवरस्ता येथील सीएनजी पंपाजवळ उभे होते. यावेळी सुरज व पवन याच्याशी झालेल्या जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी व सुरज याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच, पवन याच्यावर कोयत्याने व पालघन याने डोक्यात वार करत खून केला. तसेच फिर्यादी याच्यावर कोयत्याने वार करत तर वंजारेला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जखमी केले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Central Railway : मध्य रेल्वे लवकरच आणखी चार ठिकाणी उभारणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.