Chikhali : चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क प्रभाग आणि इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल (Chikhali) यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

या मोहिमेत जाधववाडी, चिखली, मोशी परिसरातील रस्त्यावर झाडलोट करण्यात आली, सोसायटी परिसरात स्वच्छता करण्यात आली. कचरा उचलण्यात आला. विद्यार्थ्यांनी रस्त्यालगतचे दुकानदार, रहिवाशी, नागरिक, वाहन चालक, इत्यादी यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. कचऱ्यामुळे होणाऱ्या आजाराविषयी माहिती सांगितली.

प्लास्टिक वस्तू न वापरण्याचे आवाहन केले. पान टपरी विक्रेत्यांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. रहिवाशांना ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करण्याचे आवाहन केले. रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी सूचना फलक परिधान केले होते. चम चम चमकेगा इंडिया, स्वच्छ भारत का इरादा ही विद्यार्थ्यांनी बनविलेली स्वच्छतेपर गाणी म्हणण्यात आली.

ये संदेश हमारा हैं स्वच्छता अभियान – हर घर पहुंचाना है, हर गली हर दार हर चौराहेपर स्वच्छता लायेंगे – बिमारी  (Chikhali) को दूर भगायेंगे, बिमारीयोंसे होगा छुटकारा – समाज होगा खुशहाल हमारा, स्वच्छताका कर्म अपनाओ – इसे अपना धर्म बनाओ आदी घोषणा देण्यात आल्या.

Pune : जीएसटी,पीसीएमसी अकादमी उपांत्य फेरीत; मध्य रेल्वे व क्रीडा प्रबोधिनी यांचीही आगेकूच

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी, पालकांनी, नागरिकांनी स्वच्छतेची प्लास्टिक वस्तू न वापरण्याची, ओला सुका कचरा वेगळा करण्याची, कचरा कुंडीतच कचरा टाकण्याची शपथ घेतली. महानगरपालिकेमार्फत आयोजित केलेल्या जनसंवाद सभेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्या मांडल्या होत्या. विविध प्रश्न विचारून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

सामाजिक स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या शाळेपासून ते आपल्या समाजापर्यंत राबविण्याचे धोरण आमच्या शाळेने सुरु केल्याचे संचालिका कमला बिष्ट यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने क प्रभागाचे सह-आयुक्त श्री. अण्णा बोदडे, स्वच्छता अधिकारी तानाजी दाते, डॉ. संजय सिंग, श्री प्रशांत पाटील, डॉ. अजित थिटे आदी मान्यवर तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी, शाळेचे शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी मोहीमेसाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.