BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदारसंघातील भाजप इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या (सोमवारी) होणार आहेत.
राज्यमंत्री आणि भाजपाचे पक्ष निरीक्षक रविंद्र चव्हाण हे सोमवारी (दि. 26) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. सोमवारी सायंकाळी सहा वाजता पिंपरी, मोरवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती होणार आहेत.
दरम्यान, भाजपकडून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी पाठवला जाणार आहे. त्यासाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणा-या उमेदवारांनी प्रत्येकी तीन लाख रुपये पूरग्रस्तांसाठी जमा करावेत, अन्यथा मुलाखती घेतल्या जाणार नाहीत, असे श्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like