Pimpri : शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी मुलाखती

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात युवासेना, युवती सेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदांसाठी विधानसभानिहाय, विभागनिहाय व महाविद्यालयनिहाय मुलाखती येत्या रविवारी (दि. 28) घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती शहरप्रमुख योगेश बाबर यांनी दिली.  

आकुर्डी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवार सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत या मुलाखती होणार आहेत. यासाठी युवासेना कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात युवासेना, युवती सेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदांसाठी विधानसभानिहाय, विभागनिहाय व महाविद्यालयनिहाय मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक युवक, युवती, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुकांनी सोबत एक छायाचित्र आणि वयाचा पुरावा दर्शविणारे ओळखपत्र आणावे, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.