IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादचा चेन्नईवर सात धावांनी विजय 

एमपीसी न्यूज – सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जसला हैदराबादने 157 धावांवर रोखले. चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी धोनीनं आटोकाट प्रयत्न केले पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याने एक षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने 36 चेंडूत 47 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादने हा सामना सात धावांनी जिंकला. 

सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरवात फारशी चांगली झाली नाही. शेन वॉटसन अवघी एक धाव करुन तिसऱ्या षटकात बाद झाला त्यानंतर अंबाते रायुडू, फाफ डुप्लेसिस, केदार जाधव अशी रांग लागली. रविंद्र जडेजाने दमदार पारी खेळत चेन्नई चा डाव सावरला त्यांने दोन षटकार व पाच चौकाराच्या मदतीने 35 चेंडूत 50 धावा केल्या. तो अठराव्या षटकात बाद झाला आणि. चेन्नई समोर पुन्हा आव्हान उभं राहिलं. त्यानंतर क्रिझवर असलेल्या एम एस धोनी व सॅम करण याने चांगली खेळी पण त्यांना विजयी धावसंख्या गाठता आली नाही. हैदराबाद कडून नटराजन याने दोन तर भुवनेश्वर व अब्दुल समद याने 1-1 गडी बाद केला.

हैदराबादने सुरवातीला फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 164 धावा केल्या. हैदराबाद अडचणीत असताना प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा जोडीने हैदराबादचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक 77 धावांची भागीदारी केली. या जोडीने हैदराबादच्या डावाला आकार दिला. हैदराबादकडून प्रियम गर्ग या युवा खेळाडूने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 31 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहारने सर्वाधिक 2 गडी बाद केला केले तर ठाकूर आणि चावला यांनी 1-1 गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.