IPL 2021 : ठरलं ! आयपीएल 2021चे उर्वरित सामने ‘यूएई’त होणार ; ‘बीसीसीआय’ची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल 2021 चे उर्वरित सामने यूएईत होणार आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली.

बीसीसीआयची आज (शनिवारी) विशेष बैठक घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. ‘बीसीसीआय’ T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे.

येत्या एक जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. परंतु, भारतामधील कोरोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. विश्वचषकासाठी अमिरातीचा निर्णय घेण्यात आल्यास स्टेडियमचा आधीच ताबा घेण्यात येईल. परिणामी ‘आयपीएल’चे अमिरातीत आयोजन करणे कठीण जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.