IPL 2023 – संघाच्या विजयासह प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याच्या आशा कायम

राजस्थान रॉयल्स आणि सीएसके सारख्या बलाढ्य संघाचा आपल्याच घरात झाला मोठा पराभव.

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) साखळी स्पर्धेतले सामने आता अंतिम टप्प्याकडे चालले असल्याने (IPL 2023) आणि प्ले ऑफचे गणितही चुरशीचे होत असल्याने उर्वरित सामन्यात प्रत्येक संघाला जर तरच्या खेळीवर अवलंबून राहायचे नसल्याने हमखास विजय मिळवून आपले प्ले ऑफ मधले स्थान बळकट करण्याची गरज होती, ज्यात प्ले ऑफमध्ये नक्कीच पहिल्या चार संघापैकी एक असेल असे वाटणाऱ्या राजस्थान रॉयल्सने अतिशय आत्मघातकी खेळ करत आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा पाडत आपली प्ले ऑफची वाट खडतर केली आहे. तर दुसऱ्या सामन्यात केकेआर संघाने बलाढय चेन्नईला त्यांच्याच घरात जबरदस्त मात देत एकूण सहाव्या विजयासह आपल्याही प्ले ऑफ मध्ये जागा मिळवण्याच्या आशा आणखी पल्लवित केल्या (IPL 2023)आहेत.

 

आता प्रत्येक संघाचे साधारण दोन दोन सामने(अपवाद आरसीबी) बाकी असल्याने या रविवारचे हे शेवटचे दोन सामने आज खेळवले गेले. पहिल्या सामन्यात आरसीबी संघाने मजबूत राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवून प्ले ऑफच्या जागेवर आपला दावा मजबूत करण्यात काही अंशी यश मिळवले तर केकेआरनेही या स्पर्धेत आपण अजूनही आहोत असाच संदेश आपल्या विजयासह इतर संघांना दिला.

आजचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात जयपूर येथे खेळला गेला ज्यात आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 171 धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्स पुढे ठेवले.कर्णधार डूप्लेसी आणि अष्टपैलू मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीमुळे आरसीबी संघाने ही मोठी धावसंख्या उभारली.ज्याचा पाठलाग करताना राजस्थान (IPL 2023) रॉयल्सची अभूतपूर्व घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव केवळ 59  या नीचांकी धावातच गारद झाला.

सिमरन हेटमायरच्या त्यात 35 धावा होत्या तर जो रूट च्या 10 आणि 3 अवांतर,म्हणजे इतर 8 फलंदाजांनी फक्त 11 धावा काढल्या,या बेजबाबदार खेळीमुळे राजस्थान रॉयल्स संघाला 112 धावांच्या फरकाने मोठा पराभव स्विकारावा लागला.आरसीबी संघाकडुन वेन पार्नेने फक्त 10 धावा देत तीन गडी बाद केले तर करन शर्मा आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन बळी (IPL2023)मिळवले.

संक्षिप्त धावफलक –
आरसीबी  5 बाद 171
डूप्लेसी 55,मॅक्सवेल 54,रावत नाबाद 29
जांपा 25/2,असिफ 45/2
विजयी विरुद्ध
राजस्थान रॉयल्स
10.3 षटकात सर्वबाद 59
हेटमायर 35,रूट 10
पार्नेल 10/3,ब्रेसवेल 16/2,करन शर्मा 19/2

Pune News : खडकवासला धरणात बुडालेल्या दोन मुलींचे सापडले मृतदेह

आजच्या दुसऱ्या सामन्याला चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर सुरुवात झाली ज्यात चेन्नई संघाचा कर्णधार एम एस धोनीने केकेआर विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना केवळ 144 धावाच जमवता आल्या.चेन्नईच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी (IPL 2023) धावसंख्या उभारण्यात अपयश आले. ऋतुराज (17),कॉन्व्हे (30),रहाणे (16 )हे प्रमुख फलंदाज तंबूत परतल्यानंतर डावखुऱ्या शिवम दुबेने जोरदार आक्रमण करत संघाला 144 पर्यंत नेऊन पोचवले, त्याला जडेजानेही 20 उपयुक्त धावा करत चांगली साथ दिली.

सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन बळी मिळवून सीएसके संघाच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले.
या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाचीही सुरुवात खराबच झाली. दिपक चाहरने अतिशय भेदक गोलंदाजी करत जेसन रॉय, वेंकटेश अय्यर आणि गुरबाजला बाद करत केकेआरची अवस्था 3 बाद 33 अशी बिकट करुन टाकली.यावेळी केकेआर आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागतेय की काय ही भिती वाटत असतानाच कर्णधार नितीश राणा आणि युवा पण जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजयी करुन दाखवण्यात आतापर्यंत तरी यश मिळवलेला रिंकू सिंग ही जोडी एकत्र आली आणि या जोडीने जबाबदारी ओळखत जबरदस्त खेळी करत  आपापल्या वैयक्तिक अर्धशतकाला पूर्ण करत संघाला विजयासमीप आणले.

रिंकूने आपले या तिसरे अर्धशतक पूर्ण करत चेन्नईच्या गोलंदाजांना चांगलेच निष्प्रभ केले, ही जोडीच संघाला विजयी करेल असे वाटत असतानाच रिंकू सिंग एक चोरटी धाव घेण्याच्या नादात मोईनच्या अचुक फेकीने धावबाद झाला,पण तोपर्यंत त्याने संघाला विजयाच्या अगदीच जवळ आणले होते, ती औपचारिकता कर्णधार राणा आणि रसेलने पूर्ण करत संघाला विजय मिळवून देताना आपली गुणसंख्या 12 करत आपल्या प्ले ऑफच्या आशा पल्लवित केल्या(IPL2023) आहेत.

संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज
6 बाद 144
ऋतुराज  17,कॉन्व्हे 30,रहाणे 16दुबे नाबाद 48,जडेजा 20
चक्रवर्ती 36/2,सुनील नारायण 15/2
पराभूत विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
18.2 षटकात 4 बाद 146
जेसन रॉय 10,रिंकू सिंग 54,राणा नाबाद 57
दीपक चाहर 27/3

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.