IPL In UAE: ठरलं! आयपीएल 2020 यूएईमध्ये होणार

IPL In UAE: IPL 2020 will be held in UAE आयपीएल आयोजनाबाबत बऱ्याच देशांनी बीसीसीआयला प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये यूएई या देशांचाही समावेश होता.

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या काल झालेल्या बैठकीत यंदा होणारा T20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यामुळे आयपीएलचा रस्ता मोकळा झाला आहे. मात्र, ही स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेयरमन बृजेश पटेल यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली असून आयपीएल 2020 यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं पटेल यांनी सांगितले आहे.

मात्र, या स्पर्धेच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचं पटेल यांनी सांगितलं. पुढील आठवड्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल. त्यामध्ये स्पर्धेच्या तारखा आणि संचालनाची प्रक्रिया निश्चित केली जाईल. भारत सरकारनं परवानगी दिल्यानंतर आयपीएल 2020 चं वेळापत्रक तयार करण्यात येईल, असं पटेल यांनी पुढे सांगितलं.

_MPC_DIR_MPU_II

आयपीएल आयोजनाबाबत बऱ्याच देशांनी बीसीसीआयला प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये यूएई या देशांचाही समावेश होता. आता लवकरच त्यांना स्पर्धेच्या तारखा आणि पूर्ण वेळापत्रक देण्यात येईल, असं पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, यूएईनं आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएल डोळ्यासमोर ठेवून सुविधांची तयारी करत असल्याची माहिती दुबई स्पोर्ट्स सिटीचे हेड ऑफ क्रिकेट इव्हेंट्स सलमान हनीफ यांनी दिली होती.

एशिया कप, T20 वर्ल्ड कप रद्द केल्यानंतर आता आयपीएलचं काय होणार याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले होते. आता याबाबत माहिती समोर आली असून क्रिकेटप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आयपीएलचे वेळापत्रक थोड्याच दिवसात जाहीर होईल आणि पुन्हा एकदा क्रिकेटरसिकांना आयपीएलचा थरार अनुभवता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.