Islamabad : ‘हा’ आहे पाकिस्तान वनडे आणि T-20 क्रिकेट संघाचा नवा कर्णधार

एमपीसी न्यूज – पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमदला ब श्रेणीत स्थान देण्यात आले असून, एकदिवसीय आणि T-20 क्रिकेटसाठी बाबर आझम कर्णधार असणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष मिसबाह उल हक यांनी जाहीर केले आहे. हा करार 1 जुलैपासून लागू होणार आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदची याआधीच कसोटी आणि T-20 संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2020-21 या नव्या वर्षासाठी 18 सदस्यीय राष्ट्रीय कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीत युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि इफ्तिखार अहमद या दोन नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझम याला वनडे आणि टी-20 क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर कसोटी क्रिकेटसाठी अजहर अली कर्णधार असणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष मिसबाह उल हक यांनी जाहीर केले आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये उच्च कामगिरी करणाऱ्या युवा क्रिकेटपटूंना पुरस्कृत करण्याचा भाग म्हणून ‘पीसीबी’ने एक नवीन इमर्जिंग प्लेयर्स श्रेणी तयार केली आहे. यामध्ये हैदर अली आणि वेगवान गोलंदाज हरीस रौफ, मोहम्मद हसन यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात सरफराजचा अनुभव पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मिसबाहने व्यक्त केला आहे.

बाबर आझम या खेळाडूकडे पाकिस्तानचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिले जाते. त्याच्या कामगिरीचे कौतुक आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील केले जात असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like