Pimpri : असंघटित क्षेत्रातील कामगारांना कामावर जाण्यासाठी ‘सायकल टू वर्क’चा अभिनव उपक्रम

Innovative initiative of 'Cycle to Work' to get unorganized sector workers to work

एमपीसी न्यूज –  लाॅकडाऊनच्या काळात ऑफिसला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्याने तसेच स्वत:ची गाडी नाही अशा कामगार वर्गाला कामावर हजर राहण्यासाठी  ‘सायकल टू वर्क’चा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड परिसरातील कंपन्यांना 33% मनुष्यबळासह कंपनीचे कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरू नसल्याने तसेच स्वत:ची गाडी नसल्यामुळे कामावर हजर राहण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या कामगारांना सोशल डिस्टन्सिंग पाळत कामावर पोहोचण्यास सायकल हा महत्वाचा दुवा ठरणार आहे.

यासाठी सायकल अवेरनस पुणे, निसर्ग सायकल मित्र, माऊंटन सायकलिस्ट, सायकलटूवर्क, सायकल महापौर, पुणे अशा वेगवेगळ्या सायकल क्लबचे व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि भद्राय राजते प्रतिष्ठान, पुणे यांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर शक्य होतील तितक्या सायकली उपलब्ध करून देण्याची संकल्पना तयार केली आहे.

या कामासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना, सायकल क्लब, सायकल कंपन्या, व्यक्ती यांनाही हातभार लावण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यामाध्यमातून विनावापर तरीही योग्य व चालू स्थितीत असलेली सायकल उपक्रमासाठी भेट म्हणून देण्याचे तसेच एका सायकलसाठी प्रतीमहिना 1000 किंवा जमेल तितकी रक्कम निधी म्हणून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम 2 महिन्याच्या कालावधीसाठी प्रयोग म्हणून सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी सतेज नाझरे +91 77098 04622, सुनित पाटील +91 94055 81427, अभिजीत कुपटे +91 9923005485, भद्रायराजते प्रतिष्ठाण +91 992151171 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे ‌

या उपक्रमासाठी ज्यांना मदत करायची आहे त्यांना खालील बॅंक खात्यात पैसे जमा करता येणार आहेत.

Bhadray Rajate Pratishthan
Bank: Bank Of Maharashtra, Shaniwar Peth Pune Branch
A/c No.: 60070797458
IFSC Code: MAHAB0000675.
Regd.Off.: 695 Narayan Peth, Pune-411030.
Registration No: MAHA/230/2011.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.