Pune : शेवटी जिंकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देणे महत्वाचे – अशोक चव्हाण 

एमपीसी न्यूज – काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या माजी आमदार विनायक निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका घेत काँग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठराव केल्याने निम्हण यांची पंचाईत झाली आहे. नुकताच काँग्रेसमधील दोन माजी शहराध्यक्ष तसेच इतर जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बैठक घेतली. या बैठकीत निम्हण यांना विरोध करून पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे वरिष्ठांनाच आव्हान दिल्याचे मानले जात होते. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिंकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त करत विनायक निम्हण यांना दिलासा दिला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

जिंकणारा उमेदवार आपल्या पक्षात असावा ही अपेक्षा कोणत्याही पक्षाला असतेच मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मत देखील विचारात घेतले जाईन, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अजून तरी कोणत्या मतदार संघात कोणता उमेदवार हे ठरलेलं नाही पण शेवटी कोणता व्यक्ती जिंकणार हे पाहणेही महत्वाचे आहे. अशी भूमिका स्पष्ट करत अशोक चव्हाण यांनी वरिष्ठांना आव्हान देणाऱ्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सहमतीने निम्हण यांना पक्षात घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर या ठरावावर बोलताना “मला भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची ऑफर आहे. त्यामुळे मीच निर्णय घेणार असे विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले होते. तर आज शहरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. तेव्हा यांनी पक्षासाठी केलं तरी काय ? जे नेते आज ठराव करत आहेत. त्यांच्यामुळेच आज ही परिस्थिती आज काँग्रेसवर उद्भवली आहे. तेव्हा या नेत्यांनी बोलू नये, असे कार्यकर्त्यांचे मत आहे, असे विनायक निम्हण म्हणाले होते. तर मी एक महिन्यानंतर काय करायचे याचा निर्णय घेणार असल्याचे देखील विनायक निम्हण यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.