Pune : वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – बिबवेवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे़. 
संदीप आनंदराव देवताळे (वय ४०, रा़ बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे़. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार देवताळे यांच्या घरी १७ नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप देवताळे याच्या घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन त्याने तिला घरी नेले़ तिच्यावर अत्याचार केले़. तू हे कोणाला काही सांगू नको नाही तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली़. त्यानंतर त्याने या मुलीला संपर्क करण्यासाठी स्वत:कडील मोबाईल व सिमकार्डही दिले़ व तू माझ्याशी फोनवर बोलली पाहिजे, अशी धमकी दिली़ व १०० रुपये दिले़.
या प्रकारानंतर त्याने या मुलीला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले़. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी संदीप देवताळे याला अटक केली आहे़. पोलीस उपनिरीक्षक एस़ एस़ सुतार अधिक तपास करीत आहेत़.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.