Chinchwad News : मतभेद विसरून एक होणे ही काळाची गरज – विवेक इनामदार

एमपीसी न्यूज – मतभेद बाजूला ठेवून एक होणे ही सध्याच्या काळजी गरज असल्याचे मत ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांनी मांडले.

चिंचवड येथील “असीम विश्व” या सोसायटीमधे प्रथमच 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण बऱ्हाटे, सुनील फणसे व स्वाती देशपांडे उपस्थित होते.

करोना काळात एककेंद्रित झालेले लोकांचे विचार आणि त्यातून निर्माण होणारे मतभेद यावर इनामदार यांनी आपले विचार मांडले. तसेच मतभेद बाजूला ठेवून एक होणे ही सध्याच्या काळजी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐश्वर्या निखळ हिने कार्यक्रमाचे निवेदन केले. सुनील फणसे यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन सोसायटीचे सभासद हुकुमचंद्र वायकोळे व ओंकार दिवेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.